मी मराठी

                सुस्वागतम 

Home

 

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिकापाकिस्तानसिंगापूरजर्मनीयुनायटेड किंग्डमऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]

भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवाकर्नाटकगुजरातआंध्र प्रदेशमध्य प्रदेशतमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीवदादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदासुरत, दक्षिण गुजरात व अहमदावाद (गुजरात राज्य), बेळगांवहुबळी- धारवाड, गुलबर्गाबिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूरग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू), वगैरे. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.

 

भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्‍या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांच्या सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो.४२वा अहवाल- जुलै २००३-०४ pp. para 11.3</ref>, दादरा व नगर हवेली[४] या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[५], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[६], उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश), गुलबर्गा विद्यापीठ[७], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[८] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[९] येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.